काही मिनिटांतच हर्णे गाव झाल होत्याच नव्हतं अन् उडाला एकच गोंधळ.....

Storms hit Dapoli taluka in harne village kokan marathi news
Storms hit Dapoli taluka in harne village kokan marathi news

हर्णे (रत्नागिरी) : दापोली तालुक्यातील हर्णे गावाला जोरदार गारांसह वादळी पावसाचा तडाखा बसून लाखो रुपयांच नुकसान झाले आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे वादळाचा तडाखा दापोली तालुक्यामध्ये फक्त हर्णे गावलाच बसला.
  काल (ता.१९) रात्री ठीक ८.३० वाजण्याच्या सुमारास हर्णे मध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार चक्रीवादळ आल्याने हर्णे गाव व बंदरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन गेले. संपूर्ण देशभरात कोरोनाच प्रादुर्भाव न होण्यासाठी चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व ग्रामस्थ घरातच होते. रत्नागिरी जिल्हा कोरोनाच्या बाबतीत ऑरेंज झोनमध्ये असल्याने आज ता.२० रोजी या भागातील लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे ग्रामस्थांना थोडा दिलासा मिळाला होता.

थोडा दिलासा मिळाला होता पण...

परंतु एकीकडे कोरोनाच संकट तर आहेच परंतु दुसरे संकट अचानक या चक्रीवादळाने निर्माण झाले त्यामुळे सर्व ग्रामस्थ प्रचंड घाबरून गेले आहेत. काही मिनिटांतच या चक्रीवादळाने हर्णे गावामध्ये होत्याच नव्हतं केलं. बहुतांशी घरांची छप्परचं उडून गेली. एका घरावरील पत्र्याचे अर्धे छप्परचं उडून गेल्यामुळे ऐन जेवण बनवतानाच वरून धो धो पाऊस घरात कोसळू लागला. त्यातच वीजप्रवाह देखील बंद झाल्यामुळे घरातील माणसांची रडारड आणि धावपळ उडाली.

काय करायचं कुणालाच काही सुचत नव्हते याच घरामध्ये त्यांच्या बेडरूममध्ये लहान मूल देखील झोपलेली होती. आजूबाजूचे ग्रामस्थ मदतीला धावून आले व मुलाला बाहेर काढले. एका मासेमारी नौकेवर सुरूचे झाड पडून नौकेचे पूर्ण नुकसान झाले आहे. ही नौका यावर्षी मासळीच प्रमाणच कमी असल्यामुळे बंद अवस्थेत किनाऱ्यावर शाकारलेली होती. तर फत्तेगडावरील बहुतांशी ग्रामस्थांच्या घरावरील कौलेच उडून गेली आहेत. 

असे झाले नुकसान
 दरम्यान, या वादळामध्ये आंबा व नारळ पोफळी बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या जोरदार सुटलेल्या चक्रीवादळामुळे बहुतांशी झाडांवरील आंबा गळून पडला आहे. हर्णे मधील प्रसिद्ध बोरकरांच्या बागेतील नारळाची झाडे तुटून घरावर पडली. सुदैवाने यावेळी उमेश भाटकर हे नुकतेच घटनास्थळावरून बाजूला झाले आणि नारळाचे झाड कोसळले तर पाटील खानावळ आणि मधुकर पवार यांच्या घरांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. तसेच मुख्य रस्त्यावर आंब्याचे झाड पडल्यामुळे लाईटचे दोन पोल कोसळल्यामुळे विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे हर्णे गावामध्ये बहुतांशी ठिकाणी वीजप्रवाह प्रवाह बंद अवस्थेत आहे.

मच्छिमार चिंतेतच पडला​

रस्त्यातच  झाडे पडल्यामुळे मुख्य रस्ता , ग्रामपंचायतीकडे जाणारा रस्ता, मराठी शाळेकडून मोठी गोडीबावकडे जाणारा रस्ता वाहतुकीकरिता बंद झाला आहे. केंद्रासरकारने मासेमारीकरिता लॉकडाऊनमध्ये परवानगी दिल्यानंतर काही मच्छिमार आज ता.२० रोजी मासेमारीकरिता जाणार होते परंतु काल झालेल्या या वादळाच्या तडाख्याने येथील मासेमारीकरिता आलेल्या नौकांनी थेट आंजर्ले खाडीचा पर्याय निवडून सुरक्षेकरिता खाडीतच पलायन केले. त्यामुळे नुकतीच कुठे परवानगी मिळाली होती त्याचा काहीही फायदा न झाल्यामुळे मच्छिमार चिंतेतच पडला आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com